स्मार्ट सिटी बस डेपोसंदर्भात उद्या मुंबईत बैठक

Foto
कोरोनामुळे शहर बससेवा गेले 5 महिने बंद आहे. सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांची ने - आण करण्यासाठी स्मार्ट सिटी बसचा सध्या वापर करण्यात येत आहे.स्मार्ट बस डेपोकरिता जागा आणि परिवहन विभागाला डेपो उभारण्यासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासंदर्भात महापालिका आणि परिवहन विभागाची संयुक्त बैठक 29 सप्टेंबर रोजी मुंबई येथे होणार आहे.या बैठकीतच स्मार्ट सिटी बस सुरु करण्यासंदर्भात निर्णय होऊ शकतो. 
पालकमंत्री सुभाष देसाई व परिवहन मंत्री अ‍ॅड.अनिल परब यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असल्याची माहिती मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली.शहरात धावत असलेल्या स्मार्ट सिटी बसला ब्रेक लागलेला आहे. परंतु शहरात लवकरच सिटी बस सुरु होणार असल्याचे संकेत मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले.
परिवहन विभाग उभारणार स्मार्ट बस डेपो
स्मार्ट बसेससाठी डेपो उभारण्याकरिता लिजवर जागेची मागणी राज्य मार्ग परिवहन विभागाकडे करण्यात आली आहे.बसस्थानक उभारण्यासाठी महापालिकेचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच मनपाकडून आकारण्यात येणारी फिस माफ करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या दोन्ही विषयावर एकत्रितपणे निर्णय या बैठकीत घेतला जाईल.मनपा रेल्वे स्टेशन जवळील जुन्या जागेतच बस डेपो सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker